साध्वी ऋतुंभराजी यांचे शुभहस्ते पुणे महानगरात अयोध्येतील पवित्र मातीचे पूजन

प.पु. साध्वी ऋतुंभराजी  यांचे शुभहस्ते पुणे महानगरात अयोध्येतील पवित्र मातीचे पूजन कार्यक्रमास सुरुवात.

विश्व हिंदू परिषद पुणे महानगर तर्फे अयोध्येतील पवित्र मातीचे पूजन कार्यक्रम योजिला आहे. या कार्यक्रमात अयोध्येत परम पूजनीय संतांनी केलेल्या आवाहनानुसार पुणे महानगरतील सर्व प्रमुख मंदिरातून अयोध्येतील पवित्र मातीचे पूजन करण्यात येणार असून. तेथे हिंदू बांधवांना अयोध्येतील पवित्र माती मस्तकी लावून, श्री रामजन्मभूमी अयोध्येत भव्य मंदिर उभारण्यासाठी प्रार्थना करून संकल्प सोडण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम हनुमान जयंती पर्यंत राबवण्यात येणार आहे. यावेळी श्री रामजन्मभूमी अयोध्येतील वस्तुस्थिती सर्वाना कळावी म्हणून विविध माहिती पत्रकांचे वाटप करण्यात येणार असून, नागरिकांना श्री रामजन्मभूमी बाबत विशेष कायदा लोकसभेत संमत करण्याबाबत विनिती करण्याचे पत्र मा. प्रंतप्रधान, राष्ट्रपती व खासदारांना पाठवण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाची सुरुवात शिवजयंती च्या सुमुहूर्तावर दिनांक २२ मार्च २०११ रोजी प.पु. साध्वी ऋतुंभराजी  यांचे शुभहस्ते करण्यात आली. यावेळी विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्राचे सहमंत्री श्रीनिवास कुलकर्णी, किशोर चव्हाण, वि.हिं.प. पुणे चे मंत्री भास्कर चिल्लाळ, सहमंत्री मनोहर ओक, मध्यपुणे सहमंत्री श्रीकांत कुलकर्णी, उत्तर पुणे सहमंत्री ज्ञानेश्वर इंगळे, वरुण घाटे, बजरंग दलाचे सचिन काळे इत्यादी पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.