श्रीरामनवमी निमित्त देहूरोड येथे भव्य शोभायात्रा

श्रीरामोत्सव शोभायत्रा
देहूरोड-1चिंचवड जिल्ह्यात रामनवमी निमित्त शोभायात्रा व रामोत्सवाचे कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडले ७ प्रखंडात ९० स्थानी ३२००० कायकर्ते व नागरिक यांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने व सहभागाने जिल्हा राममय झाला. दापोडी प्रखंडात २, मोशी प्रखंडात ५,वाकड प्रखंडात १, जुन्नर प्रखंडात १०, मावळ प्रखंडात ५०, आंबेगाव प्रखंडात १२ , खेड प्रखंडात २ असे ८१ रामोत्सव आणि दापोडीत १, मोशीत २, जुन्नर प्रखंडात २, मावळ प्रखंडात २ व आंबेगाव प्रखंडात १ शोभायात्रा संपन्न झाल्यात.
श्रीरामनवमी निमित्त दापोडीत भव्य शोभायात्रा

विश्व हिंदू परिषद व बजरंग दल दापोडी प्रखंड यांच्यावतीने श्रीरामनवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते . दापोडीतानाजी पुतळा येथून प्रारंभ झालेल्या या शोभायात्रेचा समारोप गणेशनगर येथील गणेश मंदिराशेजारील प्रांगणात ‘ प्रभू श्रीरामचंद्र कि जय या घोषणेद्वारे करण्यात आला. आदित्य शिंदे ,सागर लोंढे,ऋषभ गायकवाड अर्जुन बोराटे,रवींद्र बाईत व विअजय इरेवाड यांच्यासहित शेकडो रामभक्त या शोभायात्रेत सहभागी झाले होते. शोभायात्रेत आकर्षक स्वरूपाचा श्रीराम रथ व पारंपारिक स्वरूपाचे ढोल व दिंडी पथकांच्या वाद्यांमुळे संपूर्ण परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. तसेच श्रेयस इरेवाड प्रभू रामचंद्रांच्या, प्रांजल गायकवाड सीतेच्या ,समर्थ तांबे लक्ष्मणाच्या , सिद्धी इरेवाड भारतमातेच्या, ऋषिकेश रणसुभे हनुमानाच्या, स्वयम इरेवाड बाल हनुमानच्या व  सृष्टी इरेवाड ह्यांनी धारण केलेल्या पारंपारिक वेशभूषा सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. या मुलांनी रामायणातील पात्रांची वेशभूषा धारण करून शोभायात्रेत सहभाग घेत श्रीराम नवमीचे महत्व विषद केले .

देहूरोड येथे भव्य शोभायात्रा

मावळ प्रखंडातील देहूरोड उपखंडात सायंकाळी देहूरोड बाजार पेठेत भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. देहूरोडदेहूरोड कॉनटेनमेन्ट बोर्डाचे उपाध्यक्ष श्री राहुल बालघरे ,नगरसेवक श्री रघुवीर शेलार, श्री  विशाल खंडेलवाल, श्री अमोल नाईकनवरे इत्यादी मान्यवर सहभागी झाले होते. यामध्ये कोल्हापूर येथील मर्दानी खेळ , ढोल लेझीम खेळ , आकर्षक रामरथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या यात्रेत जवळपास ३५० कार्यकर्ते सहभागी झाले होते. तत्पूर्वी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने देहूरोड  उपखंडात शेलारवाडी ,गहुंजे,सांगवडे ,चिंचोली,किन्हाई, किवळे ,विकासनगर, साईनगर या परिसरातील गावी व देहूरोड येथील श्रीराम मंदिरात दुपारी १२ वाजता श्रीराम जन्म साजरा झाला.संदेश भेगडे व अमित भेगडे यांच्या नेतृत्वात सर्व कार्यक्रम पार पडले.

विश्व हिंदू परिषदे तर्फे फक्राबाद येथे चार डेपो

विश्व हिंदू परिषदे तर्फे जामखेड तालुक्यात पहिला चार डेपो फक्राबाद येथे गुरुवारपासून सुरु करण्यात आला. पहिल्याच दिवशी एक हजार लहान मोठ्या जनावरांना इतक्या साठ टन चाऱ्याचे वाटप करण्यात आले. फक्राबाद,पिंपरखेड,बावी,वंजारवाडी या भागात दुष्काळाची तीव्रता अधिक आहे .पिण्याच्या पाण्याबरोबर चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. विश्व हिंदू परिषदेचे जामखेड येथील कार्यकर्ते विवेक कुलकर्णी ,माणिकराव देशपांडे ,अंकुश काशीद,सुरेश पवार यांनी पुढाकार घेऊन रोज दहा टन कोरडा चारा परिसरातील जनावरांना पुरविण्याचा निर्णय घेतला त्यासाठी या परिसरातील चारशे शेतकऱ्यांची व त्यांच्याकडे असलेल्या पशुधनाची नोंदणी केली. आणि गुरुवारी फक्राबाद येथे चारा डेपो सुरु केला. पहिल्या दिवशी चार दिवस पुरेल एवढा वाळलेला चारा पुरविला साठ टन चाऱ्याचे वाटप करण्यात आले. यापुढे रोज दहा टन चार्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे माणिकराव देशपांडे यांनी सांगितले. विवेक कुलकर्णी यांनी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याचे आवाहन केले. यावेळी मारुती जगताप ,विश्वनाथ राउत,संजय राउत,जगन्नाथ जायभाय ,दिगंबर जगताप ,पोलीस पाटील ,योगिनाथ जायभाय आदी उपस्थित होते.
विवेक सोनक – सदस्य प्रांत प्रचार प्रसार समिती