शैक्षणिक संकुलाचा लोकार्पण सोहळा व स्नेहवर्धिनी सेवा प्रकल्पाचा शुभारंभ

विश्व हिंदू परिषद संचालित, वनवासी व दुर्बल घटक विविध सेवा प्रकल्प न्यास, नाशिक आयोजित कै.श्रीमती गोदावरीबाई ग महाजन शैक्षणिक संकुलाचा लोकार्पण सोहळा व स्नेहवर्धिनी सेवा प्रकल्पाचा शुभारेंभ महाराष्ट्र शासनाचे आदिवासी विकास मंत्री मा ना  विष्णुजी सावरा ह्यांच्या हस्ते शनिवार दिनांक ३० जानेवारी २०१६ रोजी मखमलाबाद शिवार , नाशिक येथे संपन्न झाला.

Sanchalacha Inauguration Sohna and Snehavardhini Seva Projectमा नामदार विष्णुजी सावरा म्हणाले, “विश्व हिंदू परिषदेचे देश विदेशात सेवा कार्य सुरु आहे. विश्व हिंदू परिषदे मुळे आमच्या सारखे कार्यकर्ते उच्च पदावर पोहचत आहेत. चांगले संस्कार देण्याचे काम परिषदेच्या माध्यमातून होत आहे. भारत महासत्ता बनताना दुर्बल अशिक्षित गरीब समाजाला  आधार मिळत नाही. तोपर्यंत हा देश महासत्ता होणार नाही, प्रत्येक गरीब नागरिक सुखी झाला पाहिजे, हीच भावना विश्व हिंदू परिषद बाळगून आहे.

गरीब समाजाला शिक्षण , न्याय मिळेल हा उद्देश ठेऊन आजचा प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी अनेक दानशुरांची मदत झाली. समाजात असा त्याग करणारी खूप माणसे आहेत, ह्याच त्यागातून आजची वास्तू उभारली गेली असल्याचे श्री सावरा यांनी सांगितले.

Sanchalacha Inauguration Sohna and Snehavardhini Seva Projectविश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सह-सेवा कार्यप्रमुख मा श्री मधुकर दीक्षित म्हणाले, ” सेवा कार्यातून प्रेमाची भावना निर्माण करण्याचे काम परिषद करीत आहे. कलियुगात चांगले काम करणाऱ्यांना संघटीत करणे, अन्याया विरुद्ध लढणे हे काम परिषद करते. महिलांसाठी सामाजिक कार्ये कमी आहेत. महिलांसाठी हे संकुल आहे ,याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

विश्व हिंदू परिषदेचे संघटन महामंत्री  श्री विनायकराव देशपांडे म्हणाले , “नर सेवा हीच नारायण सेवा आहे” हे  परिषदेचे ब्रीद वाक्य आहे. सेवा परमो धर्मो: हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन परिषद साठहजारांच्या वर सेवा कार्य करीत आहे. सर्व सज्जनांनी ह्या ईश्वरी कार्यात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.

विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष, श्री एकनाथराव शेटे यांनी शुभेच्छा दिल्या.

मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून कोनशिलेचे प्रकाशन झाले. भारतमाता पुजना-नंतर हरसूल येथील विद्यार्थिनींनी एकात्मता मंत्र व सामुहिक गीत सदर केले.या कार्यक्रमात अनेक दानशूर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. श्री महाजन कुटुंबीय कि ज्यांनी ५५० वाराचा भूखंड या प्रक्लापास दान केला त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे वस्तूविशारद मे.  साखाला असोसिअएस यांचाही सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकात प्रा हेरंब गोविलकर यांनी वस्तू कशी उभी राहिली व स्नेहवर्धिनी सेवा प्रकल्पाची माहिती दिली. या प्रकल्प साठी विश्वस्त निधी ( corpus fund ) उभारण्याची मनोदय प्रगट केला. यासाठी देणगीदारांना आयकर सवलत असल्याचे त्यांनी नमूद केले

कार्यक्रमाचे सूत्र संचालन न्यासाचे कार्यकरी अधिकारी अडव्होकेट विनीत महाजन यांनी केले . पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

ह्या कार्यक्रमास नाशिक शहारातील सर्व आमदार महोदय मा.बाळासाहेब सानप , मा.सौ.सिमाताई हिरे , मा.सौ.देवयानी फरांदे उपस्थित होते. त्याच बरोबर मा. खासदार  श्री.हरिश्चंद्र चव्हाण उपस्थित होते.

पंचवटीतील सर्व नगरसेवक मा.परशुराम वाघेरे, दामोदर मानकर , सौ.शालिनी पवार , सौ.रंजना भातसी, सौ. खाडे सर्व देणगीदार व मखलाबाद शिवारातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी न्यासाचे अध्यक्ष  श्री.संपतराव पाटील, कोषाध्यक्ष श्री.राजेश रत्नपारखी ,विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष श्री.चंदूभाई पटेल,न्यासाचे श्री.राम महाजन, श्री.चितळे, श्री.हर्षल जोशी, श्री.श्याम घरोटे, श्री.अरविंद ब्राह्मणकर, श्री.अमृत सदावर्ते यांनी प्रयत्न केले.

असा आहे स्नेहवर्धिनी प्रकल्प

कै.श्रीमती गोदावरीबाई ग महाजन शैक्षणिक संकुलसाठी श्री.महाजन कुटुंबीयाने सुमारे ५५० वाराचा भूखंड दान दिला  असून त्यावर दुमजली इमारत बांधण्यात आली आहे. एकंदर ४५०० चौ.फुटाचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

* पहिल्या मजल्यावर स्नेहवर्धिनी प्रशिक्षण  केंद्र चालविले जाणार आहे. ह्या किमान कौशल्यावर आधारित मुलींना प्रशिक्षण दिले जाईल. निवासी प्रशिक्षणाची सोय उपलब्ध आहे.

* दुसऱ्या मजल्यावर आर्थिक द्रुष्ट्या दुर्बल असणाऱ्या मुलींच्या उच्चशिक्षणासाठी वसतिगृहाची सोय आहे. २५ मुलींची निवास भोजनाची व्यवस्था आहे.

* वृद्ध पालकांसाठी १० ते १५ दिवस विश्रांती गृहाची सोय आहे.