वि. हिं. प. च्या सेवाकार्याने समाज जोडला आहे.

पुणे 14 जुन 2012 – विश्व हिंदू परिषद देशभरात असंख्य सेवाकार्ये करीत आहे. या सेवा तसेच कार्याने समाजातील भिन्न पंथ, जाती, स्तरातील वक्ती परस्परांशी जोडल्या जात आहेत. एकमेकांच्या सुखदुखात सहभागी झालेल्या समाजाची वीण घट्ट होत असते. असा समाज कोणतेही आक्रमण, संकट सहज परतवून लावू शकतो. विश्व हिंदू परिषद देशातील कानाकोपरा पर्यंत जावून शिक्षण, वैद्यकीय इत्यादी क्षेत्रात वंचित बांधवांसाठी काम करीत आहे. या कामाची प्रचीती आषाढीवारी आरोग्य सेवेतून येत आहे असे मत श्री प्रशांतजी हरताळकर, क्षेत्रीय संगठन मंत्री यांनी विश्व हिंदू परिषदेच्या आषाढीवारी आरोग्य सेवाचे उदघाटन करताना वक्त केले. तसेच या सेवाकार्यात सर्वांनी सर्व शक्तीने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. यावेळी व्यासपीठावर श्री प्रशांतजी हरताळकर, क्षेत्रीय संगठन मंत्री, रा.स्व. पुणे शहर संघ चालक – श्री शरदभाऊ घाटपांडे, नगरसेवक शिवलाल भोसले, तसेच श्रीराम परताणी, गणेशजी सारडा, अशोक देशमुख, दादा गुजर हे उद्योजक उपस्थित होते.

aarogyasevaयावेळी बोलताना आषाढीवारी आरोग्य सेवा प्रमुख रवींद्र मराठे यांनी माहिती दिली की विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हजारो सेवा प्रकल्प चालवले जातात. त्यातील एक महत्वपूर्ण प्रकल्प म्हणजे आषाढीवारी आरोग्य सेवा. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा – आळंदी ते पंढरपूर व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा – – देहु ते पंढरपूर या दोन पालखी मार्गांवर लाखो वारकरी १८ दिवस पायी चालत असतात. अशा वारकरी माता, बंधू – भगिनी साठी परिषदेतर्फे गेली 25 वर्षे मोफत औषधोपचार केले जातात. या वर्षी पासून श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी म्हणजे त्रंबकेश्वर, नाशीक ते पंढरपूर या मार्ग वरही सेवा, नगर मुक्कामा पासून सुरु करण्यात येणार आहे. दरवर्षी साधारण 70 ते 80 हजार वारकर्यांना या सेवाच लाभ होतो. यावर्षी ही सेवा 14 जुन २०१2 ते १ जुलै २०१2 पर्यंत तीनहि पालखीमार्गांवर दिली जाणार आहे. या प्रकल्पात 9 रुग्णवाहिका / फिरते दवाखाने, 35 डॉक्टर, 15 परिचारिका व ३५ प्रशिक्षित कार्यकर्त्यांचा समावेश असणार आहे. या रुग्णवाहिका / फिरते दवाखान्यात अद्ययावत औषधे, इन्जेक्शन, सलाईन लावण्याची व्यवस्था, तसेच छोटी शस्त्रक्रिया करण्याची सुविधा असणार आहे. या सेवेस मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता आगामी काळात परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या यासेवेचा विस्तार केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच यासेवेत सहभागी झाल्याबद्दल सर्व डॉक्टर, परिचारिका , कार्यकर्ते व हितचिंतकांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे आयोजन श्री संजय मुर्दाळे यांनी केले तर सूत्र संचालन अरुणराव भालेराव यांनी केले. या कार्यक्रमास वारकरी बांधवाची मोठी उपस्थिती होती.

aarogyasevaaarogyaseva