पर्व विशेष


देवर्षि नारद यांची जयंती – वैशाख कृष्ण प्रतिपदा.


ब्रम्हदेवांचे मानसपुत्र असलेले आणि त्यांच्याच वरदानानुसार देवर्षि नारद हे तीनही लोकांमध्ये म्हणजेच देवलोक , पृथ्वीलोक आणि पाताळ लोकांमध्ये मुक्त संचार करीत असल्याने नारदमुनी देव , संत-महात्मे ,इंद्रादी शासक व जनमानसांशी थेट संवाद करीत असत. ते देवांना जेवढे प्रिय होते तेवढेच ते राक्षस कुळांमध्येही प्रिय होते. पृथ्वी आणि पाताळ लोकांतील माहीती देवांपर्यंत पोहोचवण्याचे काम देवर्षि नारद करीत असत. ब्रम्हदेवांचे मानसपुत्र असले तरी नारदमुनी हे श्रीविष्णूंचे परमभक्त होते. नारायण-नारायण या जयघोषानेच त्यांच्या आगमनाची सूचना ही सर्वांनाच प्राप्त होत असे. नारदमुनींनी ज्योतिष विज्ञानाच्या व्यावहारिक वापराविषयी खगोलीय परिणाम विशद करुन रचना स्पष्ट केल्या आहेत. सर्व विषयात पारंगत असलेले नारदमुनी संगीताचे महागुरु असून वीणा हे त्यांचे प्रिय वाद्य आहे. नारदमुनींनी नारद पुराणाची रचना केली आहे. किर्तन परंपरेत नारदीय कीर्तनाची वेगळी परंपरा असून ती आजही अस्तित्वात असल्याचे पहावयास मिळते. साभार – जग्गनाथ लडकत