भारतीय स्त्रियांचा त्याग जगात महान!- शंकरराव गायकर

May 14, 2022


पुणे 11/05/2022 -  विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे वतीने दिनांक ०४ मे ते ११ मे २०२२ या कालावधीत दुर्गावाहिनीच्या माध्यमातून भारतीय युवतींना सुसंस्कारित आणि स्वसंरक्षणार्थ सक्षम करण्यासाठी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर, पुणे येथे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराच्या समारोप प्रसंगी शंकरराव गायकर यांनी मार्गदर्शन केले. कर्नावती क्षेत्र दुर्गावाहिनी संयोजिका डॉ. यज्ञाताई जोशी, प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत, प्रांत उपाध्यक्ष माधवीताई संशी, मुंबई क्षेत्र संघटनमंत्री श्रीरंग जी राजे, प्रांत संघटन मंत्री अनिरुद्ध पंडीत, प्रांत मंत्री संजयराव मुरदाळे, प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे आदि प्रमुख उपस्थित होते.
दिनांक ०४ मे रोजी प्रशिक्षणार्थी युवतींचे एकत्रिकरण करण्यात आले. दिनांक ०५ मे रोजी सकाळी (अ.भा.मातृ.स.सं)सौ.मीनाताई भट्ट यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी सौ.मीनाताई भट यांनी विश्व हिंदू परिषदेची स्थापना आणि उद्दिष्टे याविषयीची माहिती दिली. दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षण शिबिरामध्ये शारीरिक, बौद्धिक, चर्चा आणि कृती अशा विविध सत्रांच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थीं युवतींना प्रशिक्षण देण्यात आले. दररोज पहाटे साडेचार वाजेपासून ते रात्री सव्वादहा वाजेपर्यंत विविध विषयांवर प्रशिक्षणार्थींना प्रबोधन करण्यात आले. पहाटे प्रात:स्मरणात श्लोक, रामनामाचा जप, दिनविशेष, प्रेरक कथा आणि पंचांग सांगितले गेले. शारीरिक सत्रांच्या माध्यमातून सकाळी आणि संध्याकाळी दोन तास दंड, नेमबाजी, नियुद्ध, योग, बाधा ,ढोल, समता इत्यादींचे प्रशिक्षण दिले गेले. बौद्धिक सत्राच्या माध्यमातून विविध मान्यवर तज्ज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. यांमध्ये मा. विनायकरावजी देशपांडे (केंद्रीय महामंत्री) यांनी भारताचा गौरवशाली इतिहास कथन केला.मा.प्रज्ञा महाला (अखिल भारतीय दुर्गावाहिनी संयोजिका) यांनी कुटुंबप्रबोधनाविषयी मार्गदर्शन केले,अमृता नळकांडे (पश्चिम महाराष्ट्र प्रांत दुर्गावाहिनी संयोजिका) यांनी दुर्गवाहिनीची स्थापना आणि उद्दिष्टे याविषयीची माहिती दिली; तर( मुंबई व गोवा क्षेत्र सेवा प्रमुख) मा.भार्गवराव सरपोतदार यांनी सामाजिक समरसता तसेच  दिनांक १० मे रोजी डॉ. यज्ञा जोशी यांनी राष्ट्रीय सुरक्षेमध्ये महिलांचे योगदान आणि रामजन्मभूमीची सद्यस्थिती तसेच लव जिहाद या विषयावर माहिती दिली.दिनांक ८ मे २०२२ रोजी सायंकाळी शौर्य यात्रा निघाली.त्यात दुर्गांनी उत्साहाने सहभाग घेतला.
चर्चासत्रांमध्ये 'हमारी प्रार्थना' मा.किशोरी कोळेकर( क्षेत्र सं.दु), 'गोरक्षा'सुनीता देशमुख(प्रांत गोसेवा प्रमुख),'हिंदू घर'मा.प्रज्ञाजी महाला, 'छोटे छोटे सेवाकार्य मा.तुषारजी कुळकर्णी(प्रांत सेवा प्रमुख), 'सोशल मीडिया'मा.गणेश मांजरे(प्रांत सोशल मीडिया प्रमुख),'महिला व कायदे'ऍड.प्रशांतजी यादव इ.तज्ज्ञांनी सहभाग घेतला. दि.७ मे रोजी रात्री सत्रामध्ये मा.दादा वेदक (केंद्रीय सत्संग स.प्रमुख )यांनी सत्संगाच्या माध्यमातून दुर्गांचा उत्साह वाढवला.

समारोप प्रसंगी शंकरराव गायकर पुढे म्हणाले की, "रामायण काळात सीता, ऊर्मिला यांचा त्याग अद्वितीय होता. ती परंपरा रजपूत स्त्रियांनी पुढे चालवली. क्रांतिकारक भगतसिंग यांची माता विद्यादेवी तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कुटुंबातील महिलांपासून असंख्य ज्ञात-अज्ञात महिलांनी कौटुंबिक पातळीवर केलेल्या त्यागामुळे भारतीय स्वातंत्र्याचा लढा यशस्वी झाला. दुर्गावाहिनी शौर्य प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून युवतींना आपल्या मनगटातील बळाची अन् मनाच्या सामर्थ्याची जाणीव झाली आहे!".
 समता, दंड, नियुद्ध,तलवार रायफल,योगा,रोप योगा ,सुर्यनमस्कार,ढोल पथक इत्यादी प्रात्यक्षिक दुर्गांनी करुन दाखवले. या कार्यक्रमाला पालक वर्गही उपस्थित होते.
विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी शौर्य प्रशिक्षण वर्ग मे २०२२ प्रशिक्षणार्थी संख्या  १७२ शिक्षिका संख्या  १६ व्यवस्था  ८ सहभागी जिल्हे  २१
वर्गाची सर्व जबाबदारी अगदी व्यवस्थितपणे पार पडावी म्हणून दोन महिन्यांपासून अविरत परिश्रम घेतलेल्या छ.संभाजी भागातील सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद. विभाग मंत्री प्रदिपजी वाजे, विभाग सहमंत्री श्री लाड, विभाग मंत्री नितीन जी वाटकर, लहुजी धोत्रे, नितीन जी महाजन,  अनंतादादा शिंदे (जिल्हा मंत्री छ संभाजी भाग), राजेश दादा जाधव (जिल्हा सहमंत्री छ संभाजी भाग) आणि त्यांची संपुर्ण टीम यांचे मनापासून धन्यवाद.विज,लाईट,पाणी, निवास, यातायात, मैदान इत्यादी सर्व व्यवस्था अगदी चोखपणे पार पाडणाऱ्या सर्व दादांचे मनापासून धन्यवाद.भोजन व्यवस्था प्रमुख श्री तुषारजी कुलकर्णी आणि चंद्रकांतदादा कदम यांच्या संपुर्ण टिमचे मनापासून धन्यवाद. तळेगाव येथे दि.२ मे ते ३ मे २०२२शिक्षिका प्रशिक्षण वर्गासाठी ज्यांचे सहकार्य मिळाले त्या आसावरीताई बुधकर आणि सकाळ संध्याकाळ शिक्षिकांना प्रशिक्षण देण्यासाठी येणाऱ्या बजरंगी दादांचे मनापासून धन्यवाद.बौद्धिक व्यवस्था प्रमुख सौ.प्रियाताई रसाळ आणि भगवती रायते.सर्व दुर्गांची काळजी घेणाऱ्या मातृ शक्ती सौ.रेवती ताई हणमसागर,सौ.अरुणाताई माने,सौ. अर्चना ताई रानडे.प्रज्ञाताई सावंत यांचे मनापासून धन्यवाद.सर्व दुर्गांनी सक्रिय सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचे हार्दिकआभार.सर्व दुर्गांची अगदी घरच्या सारखी रहाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून सतत प्रयत्नशील असणारे मा.प्रदीपजी आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे मनापासून धन्यवाद.पोलिसांनी शौर्य यात्रेसाठी परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि चोवीस तास आमच्या सेवेत तत्पर असलेले आपले बजरंगी गजानन दादा यांचे मनापासून धन्यवाद.प्रत्येक क्षणी जे आमच्या पाठीशी कणखरपणे उभे होते असे पालक दत्ता राम रामदासी, मा संजयराव कुलकर्णी,
कार्यक्रमाला व्यवस्थेत असणारे कार्यकर्ते श्री विठ्ठल जाधव सहमंत्री श्री दत्ता गुंजाळ बजरंग दल संयोजक श्रीमती संजीवनी ताई चौधरी मातृशक्ती संयोजिका
श्री देवव्रत भांनगावकर श्री सुरेश पवार, श्री सांतोष पवार, श्री राम कुंभार, अक्षय दाभोळकर, आप्पा दसवडकर, अजय धुमाळ,  तुषार नालगुडे, तेजस नालगुडे, आशिष दुसाने, अमोल कदम,  श्रीमती अंजू माळी, सौ प्रियाताई रसाळ, सौ.शितलताई जाधव,कृपाताई क्षोत्रिय,अंकिता ताई तोडकर, आरतीताई महाडिक, प्रतीक्षाताई जाधव, प्रतिभाताई हंसरिया आदिनी व्यवस्था पहिली, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पणे ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्या सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद