संस्काराने देश घडतो - विनायकराव देशपांडे

April 1, 2022


संस्काराने माणसं घडतात, संस्काराने कुटुंब घडतात, संस्काराने देश घडतो 

पुणे 30/03/2022 - आपली मुले संस्कारित व्हावीत असं सगळ्याच पालकांना वाटते. यासाठी नैतिक मूल्य शिक्षण समिती प्रयत्न करीत आहे. प्रत्येक भागात, गावात, वस्तीत, सोसायटीत, मंदिरात, समाजमंदिरात असे संस्कारवर्ग घेण्याचे प्रयत्न समितीतर्फे केले जात आहेत. हे संस्कार वर्ग घेण्यासाठी उपयुक्त पुस्तिका
प्रा. संजय मुरदाळे यांच्या लेखणीतून साकारलेल्या संस्कारदीप या पुस्तिकेचा भव्य प्रकाशन सोहळा बुधवार दिनांक ३० मार्च २०२२ रोजी सायंकाळी ६:०० वा.
मा. विनायकराव देशपांडे (केंद्रीय संघटन महामंत्री, विहिंप) यांच्या शुभहस्ते तसेच मा. आश्लेषा महाजन (प्रसिद्ध लेखिका, बालसाहित्यिका) यांच्या उपस्थितीत म. ए. सो. चे मुलांचे विद्यालय, पेरूगेट, भावे हायस्कूल, सदाशिव पेठ, पुणे येथे संपन्न झाला. 

       या कार्यक्रमाची सुरूवात भारत मातेच्या समोर दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर भावे हायस्कूल च्या विद्यार्थांनी संस्कारदिप या पुस्तकातील एक सुंदर कविता वाचन केलं.
      विश्व हिंदू परिषदवतीने देशभरात व देशाबाहेर संस्कार वर्ग चालविले जातात यासाठी संस्कार वर्गाचे साहित्य निर्माण करायला पाहिजे याकरिता शिक्षकांचे एकत्रीत बैठक घेण्यात आली यात लहान मुलांना आवडतील समजतील असे संत कथा, काविता अस लिखाण एका दमात १५ दिवसात लिखाण केलं. "मी लेखक नाही परंतू लहान मनावर चांगले संस्कर व्हावेत यासाठी लिखाणाची सुरूवात केली ते पूर्णत्वास आलं. "संस्कारदिप" या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी या पुस्तकाचे लेखक श्री. संजयजी मुरदाळे यांनी आपल्या प्रस्तावनेत सांगितले
         या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलताना मा. विनायकराव म्हणाले "या कार्यक्रमाचा प्रारंभ भारत मातेच्या समोर दीप प्रज्वलन करून केला, आता तो दिवस दूर नाही की आपली भारत माता सांस्कृतिक सिंहासनावर विराजमान होणार. संस्काराने माणसं घडतात, संस्काराने कुटुंब घडतात, संस्काराने देश घडतो. अनेक वर्षाच्या संस्काराच्या साह्याने संस्कृती घडते. विश्व हिंदू परिषदवतीने देशभरात व देशाबाहेर संस्कार वर्ग चालविले जातात सर्व स्तराच्या वस्तीत चांगल्या संस्काराची अवशकता आहे." तसेच या पुस्तकाविषयी बोलतांना पुढे म्हणाले की संजयराव लेखन उत्तम करतात त्यांचा हात न थांबता पुढे सतत लिहीत राहावे".
           मा. आश्लेषा महाजन (प्रसिद्ध लेखिका, बालसाहित्यिका) यांनी या पुस्तकातील एक सुंदर पद्य वाचन करून म्हणाल्या की पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, त्या एकत्र कुटुंब पद्धतीत संस्कार नावाचा वर्ग आसायचा, आता या आधुनिकतेच्या काळाच्या ओघात तो सुटत चालला असल्याने मुलांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी संस्कार वर्ग खूप महत्वाचा आहे"
         याप्रसंगी व्यापीठावर मा. विनायकराव देशपांडे (केंद्रीय संघटन महामंत्री, विहिंप), मा. आश्लेषा महाजन (प्रसिद्ध लेखिका, बालसाहित्यिका), मा. पांडुरंगजी राऊत (प्रांत अध्यक्ष, विहिंप, पश्चिम महाराष्ट्र प्रांत ) मा. संजय मुरदाळे (प्रांत मंत्री, विहिंप, पश्चिम महाराष्ट्र प्रांत), मा. सतिश गोरडे (प्रांत सह मंत्री, विहिंप, पश्चिम महाराष्ट्र प्रांत ) मा. शिंदे सर (प्राचार्य, भावे हायस्कूल) सौ. मुरदाळे उपस्थित होते, तसेच सौ. माधवी संशी, प्रांत उपाध्यक्षा, श्री. अनिरुद्ध पंडीत प्रांत संघटन मंत्री, C.A. महेंद्रभाई देवी प्रांत कोषाध्यक्ष, श्री. विवेक सोनक प्रांत प्रचार प्रमुख, श्री. मनोहर ओक प्रांत मठ मंदिर प्रमुख, श्री. संजय कुलकर्णी, प्रांत धर्मचार्य संपर्क प्रमुख, श्री. नागनाथ बोंगरगे प्रांत सत्संग प्रमुख, श्री. नटराज जगताप प्रांत सत्संग सह प्रमुख, श्री. तुषार कुलकर्णी प्रांत सेवा प्रमुख, ॲड. मृणालिनीताई पडवळ प्रांत मातृशक्ती संयोजिका, श्री. रामदासी सर नैतिक मूल्य शिक्षण समिती प्रमुख, श्री. नितिन वाटकर पुणे ग्रामीण विभाग मंत्री, श्री. धनंजय गायकवाड पुणे पूर्व विभाग मंत्री, श्री. खिस्तीसर, विश्व हिंदू परिषद पदाधिकारी, कार्यकर्ते व कार्यकर्त्या आणि भावे हायस्कूल शिक्षकवृंद उपस्थित होते. मा. सतिश गोरडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दामोदर मकाशिर यांनी केले
वृतांकन – विवेक वसंतराव सोनक , विश्व हिंदू परिषद 
प्रांत प्रचार प्रमुख , पश्चिम महाराष्ट्र प्रांत